सिध्दार्थची ही कमेंट वाचून तुम्हीही मृण्मयीचा हा फोटो निरखून पाहाल

By  
on  

सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरी आहे आणि त्यामुळेच त्यांच्यातल्या विविध कल्पनाशक्तीला वाव देत आहेत. बहुधा ती भन्नाट कल्पनाशक्तीच असते. आता हेच पाहा ना , मराठीतील गुणी अभिनेत्री व दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने नुकताच तिचा एक ब्लॅक आणि व्हाईट क्लासिक असा फोटो शेअर केला आणि .........अहो आणि काय नेहमीप्रमाणे चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव तर केलाच, पण....पण .....माहितीय तुम्हाला पणच्या पुढची गोष्ट जाणून घ्यायची उत्सुकता आहे. 

तर सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकरने मात्र मृण्मयीच्या या फोटोवर अशी काही कमेंट केलीय की तुम्हीसुध्दा ती वाचून खळखळून हसाल आणि सिध्दार्थच्या भन्नाट कल्पनाशक्तीला दाद द्याल. सिध्दार्थ हा मृण्मयीचा हा फोटो पाहून म्हणतो, जेव्हा केसात पाल अडकते तेव्हा.. . त्याची ही जबरदस्त कमेंट वाचून तुम्हीही तो फोटो निरखून पाहताय ना. 

अहो चाहत्यांची तर ही कमेंट् वाचून हसून हसून पुरेवाट लागली आहे. 

सिध्दार्थ आणि मृण्मयीच्या मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर त्यांची मैत्री खुप जुनी आहे. अग्निहोत्र  या मालिकेपासून छोट्या पडद्यावरुन दोघांची कारकिर्द सुरु झाली आणि आज दोघेही यशोशिखरावर आहेत. 

Recommended

Loading...
Share