अभिनेत्री मृणाल दुसानिसने शेअर केली लहानपणीची ही गोड आठवण

By  
on  

सिंपल लूक आणि लोभस हास्याने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. मृणालने आजवर अनेक मालिकांमधून काम केलं आहे. तिच्या साध्या लूकने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. या गोड अभिनेत्रीने नुकताच एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, हा माझा बालवाडीचा फोटो.

 

 

आज अचानक सापडला. आणि या आमच्या जोशीबाई. त्यांच्याशी माझं अजूनही कधी कधी बोलणं होतं. हा फोटो पुसट असला तरी आठवणी पुसट नाही. मी मागे जाऊ शकले असते तर किती छान. मी या फोटोत कोप-यात उभी आहे.’ मृणाल सध्या ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या मालिकेत तिच्यासोबत शशांक केतकरही आहे.

Recommended

Loading...
Share