By  
on  

आदिनाथ कोठारे रमलाय पेंटींगमध्ये, पाहा हे अप्रतिम ऑईल पेंटींग

सर्वच दैनंदिन कामं आज ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. पण आता हळूहळू अनलॉक १ मध्ये ब-याच प्रमाणात नागरिकांना शिथिलता मिळू लागली आहे. तसंच आता लवकरच मालिका , वेबसिरीज आणि सिनेमांच्या  शूटींगचासुध्दा योग्य ते नियम पाळत श्रीगणेशासुध्दा होत आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. 

या लॉकडाऊन काळात सर्वांनाच खुप छान मोकळा वेळ मिळाला आहे. प्रत्येकाला आपली कला जपता येतेय. अभिनेता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारेनेसुध्दा ब-याच काळानंतर ऑईन पेटींगवरचा आपला हात आजमावला. बिझी शेड्यूलमुळे त्यालाही यासाठी वेळ मिळत नव्हता. नुकतंच त्याने काढलेलं हे अप्रतिम सूर्यास्ताचं ऑईल पेंटींग त्याने सोशल मिडीयावरुन शेअर केलं. तेसुध्दा पूर्णत्त्वास यायच्या चार स्टेप्समध्ये . 

चाहत्यांनी आदिनाथने काढलेलं  हे ऑईल पेंटींग पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive