By  
on  

बापरे ! बायको मंजिरीकडून प्रसाद ओकला मिळालीय Warning, जाणून घ्या रागाचं कारण

प्रसाद ओकच्या भन्नाट कल्पना शक्तीला तोड नाही हे तुम्हाला माहितच असेल. पण अहो, त्याने आता एक वेगळीच कामगिरी केलीय आणि त्याच्यावर पत्नी मंजिरी ओक भलतीच संतापलीय...अहो नुसती संतापलीय कसली, चक्क तिने त्याला वॉर्निंगच दिलीय. बसला ना आश्चर्याचा धक्का...विश्वास बसत नाही म्हणता का...गोड जोडी आहे ना...पण अहो पुरावा सापडलाय.

..

प्रसादला म्हणे मंजिरीने कणिक मळायला सांगितली आणि पठठ्याने हे कणकेचं असं भूत केलं....मग काय मंजिरीबाईंचा पारा चढला आणि थेट ताकिदच दिली, म्हणाल्या, प्रसाद तुला warning देतीय .. पुढचा धोका वेळीच ओळख आणि हे तोंड घेऊन ताबडतोब पळून जा..

प्रसाद आणि मंजिरी ओक दोघंही भन्नाट आहेत. या मिश्कील पोस्टमधून आणि त्याच्या प्रतिक्रीयेतून दोघांमधली धम्माल केमिस्ट्री पुन्हा समोर आली. अनेक सेलिब्रिटींचीसुध्दा या पोस्टवर हसून हसून पुरेवाट लागलीय. हे कपल सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतं व हास्याचे कारंजे उडवत राहतं. 

Recommended

PeepingMoon Exclusive