By  
on  

हे मराठी दिग्दर्शक म्हणतात, 'मनाचाही फॅमीली डाॅक्टर असायलाच हवा'

बॉलिवूडचा  एक हरहुन्नरी कलाकार म्हणून सुशांत सिंह राजपूत ओळखला जायचा  एम एस धोनी सिनेमात धोनी साकारुन त्यानं सर्वांचीच मनं जिंकली . पवित्र रिश्ता या मालिकेतील मानवच्या भूमिकेमुळे तो घराघरांत पोहचला. बॉलिवूडमध्येही त्याने आपलं स्थान निर्माण केलं.  मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर चाहते आणि कलाविश्व शोकसागरात बुडालं. त्याचं जाणं चटका लावून तर गेलंच पण आत्महत्येचं गूढ अद्याप अस्पष्टच.

पण सुशांतच्या जाण्यानंतर तो कोणत्या नैराश्येने ग्रासला होता, ह्याचेच सर्व तर्क लावतायत. मनाचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे, हा मुद्दा आत्ता ऐरणीवर आला आहे.  याच मुद्यावर प्रसिध्द दिग्दर्शक समीर विद्वांसनं पोस्ट ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात,  “काही घडलं वा घडलं नाही तरच नैराश्य येतं हा खूप मुर्ख गैरसमज आहे. नैराश्य हा मनाचा आजार आहे. जसं पोट दुखतं, ताप येतो तसंच मनही दुखतं. मनालाही ताप येतो. ते मान्य करायला लाजू नका. ते मान्य करणाऱ्याला हिणवू नका. प्लिज. जसा फॅमिली डॉक्टर असतो, तसा मनाचाही फॅमिली डॉक्टर असायलाच हवा. नैराश्य येणं कमीपणाचं नाहीये.

अजिबातच! ऐहीक सुखाचा, आत्मसन्मानाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मला हे सांगताना अजिबात लाज वाटत नाही की, मीही नैराश्येवर औषध, थेरपी घेऊन मात केलीय. औषध, थेरपी संपली पण, समुपदेशन घेत होतो आणि घेत राहीन. कारण त्याने माझं मन सुदृढ राहतं.”

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive