By  
on  

'कुठलही चुकीचं पाऊल उचलण्याआधी एकदा ......', पाहा सिध्दार्थ जाधवचा हा मोटिव्हेशनल व्हिडीओ

मेकॅनिकल इंजिनीअर, बॅकग्राऊण्ड डान्सर, छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय नायक ते .....बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख प्रस्थापित करणा-या सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या करणं सर्वांनाच चटका लावून गेलं... वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी असंख्य प्रश्न तो मागे सोडून गेला...पण या झगमगाटी  चंदेरी दुनियेतील असं टोकाचं पाऊल उचलणारा  सुशांत हा पहिला नाही...ऐन उमेदीच्या काळात त्याने ही एक्झीट स्वत:हून निवडली.... नैराश्य हे यामागचं सर्वात मोठं कारण असू शकतं. म्हणूनच मराठीतला एनर्जी  मॅन सिध्दार्थ जाधवने याच अनुषंगाने नुकताच एक मोटीव्हेशनल व्हिडीओ शेअर केला आहे. 

“आयुष्यात कितीही संकटं आली तरी घाबरु नका त्या संकटांशी लढा. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधीना कधी नैराश्य येतं पण आत्महत्या हा त्यावरील उपाय असू शकत नाही. कुठलही चुकीचं पाऊल उचलण्यापूर्वी एकदा आपल्या आई-वडिलांचा विचार नक्की करा.” असा सल्ला सिद्धार्थने दिला आहे. तसंच त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

 

बॉलिवूड अभिनेता सुशांतच्या जाण्यानंतर नैराश्याचा हा मुद्दा खुप ऐरणीवर आला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive