By  
on  

Video: बिग बींसोबत स्क्रीन शेअर केलेल्या पार्थ भालेरावने सांगितला त्याचा नैराश्येचा अनुभव

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांतसिंह राजपूतने वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आयुष्य संपवलं..त्याच्या जाण्यानंतर नैराश्य हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे... सुशांतचं जाणं कलाविश्वच नाही तर अवघ्या देशाला चटका लावून गेलं. त्यामुळे इंडस्ट्रीतील नवोदित, होतकरु आणि स्वत:च्या हिंमतीवर अभिनय क्षेत्रात जम बसवणा-यांच्या मानसिक आरोग्याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे. प्रसिध्दी, पैसा, स्पर्धा आणि स्टेटस हे सर्वकाही टिकवून ठेवण्यासाठी मनावर येणारा ताण हा  आता प्रकाशझोतात आला आहे. 

हिंदी इंडस्ट्रीसोबतच या नैराश्यावर आता अनेक मराठी कलाकार व्यक्त होऊ लागले आहेत, आपले अनुभव सांगू लागले आहेत. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा आणि भूतनाथ रिटर्न्स या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या पार्थ भालेरावनेसुध्दा त्याच्या आयुष्यातील नैराश्येचा अनुभव सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे. हा त्याचा व्हिडीओ जरुर पाहा, नैराश्य सर्वांनाच ग्रासतं, हे तुम्हाला पार्थचे अनुभव ऐकून कळेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Speak out. And listen. Love

A post shared by Parth Bhalerao (@parthbhalerao) on

 

पार्थने मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.  भूतनात रिटर्न्स सिनेमामुळे पार्थला खरी ओळख जरी मिळाली असली तरी त्याचं मराठी सिनेमांमधूनसुद्दा उल्लेखनीय कामगिरी केलीय. किल्ला, लालबागची राणी, बॉईज, बॉईज -२, गर्ल्स, हे त्याचे लोकप्रिय सिनेमे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive