सुशांतच्या मृत्यूची बातमी कळताच अंकिताने लहान मुलासारखा विलाप केला: प्रार्थना बेहरे

By  
on  

बॉलिवूडचा  एक गुणी कलाकार म्हणून सुशांत सिंह राजपूत ओळखला जायचा. बॉलिवूडमध्येही त्याने आपलं स्थान निर्माण केलं.  मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतला यशाच्या शिखरावर पोहोचवलं ते ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने. या मालिकेतील त्याची सहकलाकार अंकिता लोखंडेसोबतचं त्याचं नातंही फार गाजलं. सुशांत-अंकिताची जोडी ऑफस्क्रीनही एकत्र दिसू लागली. काही वर्षांनंतर त्यांचं ब्रेक अप झालं. 

 

जेव्हा अंकिताच्या कानावर सुशांतच्या आत्महत्येची बातमी पडली. तिला जबदस्त धक्का बसला. त्यावेळेपासून जणू तिचे अश्रू थांबत नव्हते. एखाद्या लहान मुलीसारखी विलाप करत होती. पवित्रा रिश्तामधील या दोघांची को-स्टार प्रार्थना बेहरेने ही माहिती दिली. अंकिता मुळातच संवेदनशील असल्याने तिने त्याचं अंतिम दर्शन घेणं टाळलं.  पवित्र रिश्ताच्या वॉट्स अ‍ॅप ग्रुपवर त्याच्या अंत्यविधीला जाण्यासंबंधी चर्चा सुरु होती. पण तिथे केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असल्याने जाणं राहित केल्याचंही प्रार्थनाने सांगितलं.

Recommended

Loading...
Share