By  
on  

अपुर्वा नेमळेकरने चाहत्यांच्या भेटीला आणली आहे ‘सॉफ्टी कोमल’

‘रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंता भूमिकेतून प्रसिध्द झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता आणखी एका माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अपूर्वाने नुकतच तिचं यूट्यूब चॅनल सुरु केलं आहे. या चॅनलच्या माध्यमातून ती एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांसमोर येत आहे.

 

 

‘द फोनिक्स’ असं तिच्या युट्युब चॅनेलचं नाव आहे. या चॅनेलवर ती ‘अशी मी, तशी मी, कशी मी?’ या शोच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते. आताही तिने सॉफ्टी कोमल नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. टिकटॉक लव्हर आणि इंटरनेटला चौथी मुलभूत गरज मानणारी ही कोमल धमाल आहे. कोमलच्या लूकमधील अपुर्वाचा मेकओव्हरही तुम्हाला नक्कीच आवडेल.

Recommended

PeepingMoon Exclusive