By  
on  

Video : राहुल देशपांडेंच्या स्वरसाजात सजलं 'या चिमण्यांनो परत फिरा रे.....'

सुप्रसिध्द गायक राहुल देशपांडे हे सोशल मिडीयावर नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या विविध गायन प्रयोगाचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत त्यांना म्युझिकल ट्रिट देतात. नुकतंच राहुल देशपांडे यांनी आपल्या  स्वरसाजातून नेटक-यांना मंत्रमुग्ध केलं आहे. 

भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रसिध्द गीत या चिमण्यांनो परत फिरा रे...हे राहुल देशपांडे यांनी नुकतंच सादर केलं व तो व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. हे प्रसिध्द गीत पंडीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलं असून ग.दि.माडगूळकर यांच्या लेखणीतून साकारलं आहे. 

चाहत्यांनीसुध्दा सोशल मिडीयावरुन राहुल देशपांडे यांना गाण्यासाठी मनमुराद दाद दिली असून कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

 राहुल देशपांडे हे आजोबा आणि हिंदुस्तानी संगीत शैलीतील प्रसिध्द गायक डॉ.वसंतराव देशपांडे मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत. 'मी वसंतराव'  या सिनेमात राहुल देशपांडे वसंतरावांच्या भूमिकेत दिसणार आहे.हा सिनेमा लॉकडाऊन संपल्यानंतर रसिकांच्या भेटीला येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive