By  
on  

दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिल्या शाकालला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा Video

मराठी सिनेसृष्टीत अभिनयाने मालिका व सिनेमांमध्ये छाप सोडणारा हरहुन्नरी अभिनेता वैभव मांगलेचा आज वाढदिवस आहे. पण या शाकालला दिग्दर्शक रवी जाधव यांनी मात्र खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. रवी जाधव म्हणतात, वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा वैभव, टाइमपास मधील हा छोटासा प्रसंग तू आपल्या अभिनयाने अजरामर केलास!!!
तू साकार केलेली माधवराव लेले उर्फ ‘शाकाल’ ही व्यक्तिरेखा आजही रसिकांच्या मनात कोरलेली आहे आणि कायम राहील.

 

 

रवी जाधव यांच्या टाईमपास आणि टाईमपास २ या दोन्ही सिनेमात वैभव मांगले यांनी माधवराव लेले ही व्यक्तिरेखा साकारली. प्राजक्ताचे वडील साकारणा-या वैभवला दगडूने सिनेमात शाकाल हे टोपणनाव ठेवलं होतं. त्यामुळे ही भन्नाट व्यक्तिरेखा सिनेमात तेव्हा येणारं पार्शवसंगीत यामुळे कुप धम्माल उडाली होती. 

हे दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफीससोबतच रसिकांच्या मनावरही राज्य केलं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive