By  
on  

अनन्या आणि तिच्या बाबांचा हा नितांत सुंदर आणि स्पेशल फोटो आवडला ना?

अनन्या या एका तरुण मुलीच्या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रवी जाधव निर्मित आणि प्रताप फड दिग्दर्शित अनन्या या सिनेमात अभिनेत्री ऋता दुर्गुळे अनन्या साकारतेय हे आपण सर्वच जाणतो. या सिनेमात अनन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे तिचे बाबा साकारतायत अभिनेते योगेश सोमण.  जागतिक फादर्स डेच्या निमित्ताने अनन्या व तिच्या बाबांचा सिनेमातला हा सुंदर फोटो नुकताच निर्माते रवी जाधव यांनी उलगडला. 

अनेक मालिका, नाटकं व  सिनेमे यांसोबतच हिंदी सिनेमांमध्येही योगेश सोमण यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. उरी सिनेमातील त्यांनी साकारलेली संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांची भूमिका लक्षवेधी ठरली. त्याचं सर्वत्र कौतुक झालं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @ananyathefilm ・・・ अनन्या आणि तिच्या बाबांचा हा नितांत सुंदर आणि स्पेशल फोटो आवडला ना? तुम्ही देखील तुमच्या बाबांसोबतचा असाच एखादा गोड आणि स्पेशल फोटो तुमच्या अकाउंटवर आज किंवा उद्या दुपारी २ वाजेपर्यंत पोस्ट करा आणि @ananyathefilm ला टॅग करा!! त्यापैकी आमच्या अनन्याला आवडलेले ५ बेस्ट फोटो उद्या फादर्स डे च्या निमित्ताने आम्ही @ananyathefilm या अकाउंटवर पोस्ट करु आणि ते ही त्या पाच जणांना टॅग करून!! चला मग करा सुरुवात आणि हो तुम्हा सगळ्यांना 'बाप दिनाच्या शुभेच्छा' #Ananya #AnanyaCelebratesFathersDay #FathersDayCelebrationWithAnanya #AnanyaCheBaba #happyfathersday

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

अनन्याच्या जिद्दीचा प्रवास आता लवकरच रुपेरी पडद्यावर रसिकांना अनुभवता येणार आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' अशी प्रेरणादायी टॅगलाइन घेऊन 'अनन्या' आता सिनेमा रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी संयम आवश्यक आहे. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहूनच ‘अनन्या’ आपल्या भेटीला येईल आणि तेही दणक्यात! #Ananya #ShakyaAahe #itspossible #BePositive @ananyathefilm * Produced By - @dhruvdas23 (@dreamweaver_entertainment_ production) and @ravijadhavofficial ( #ravijadhavfilms ) * Written and Directed By - @pratapphad * Presented By - Swaroop Studios @hruta12 | @suvratjoshi | @rucha.apte | @chetanchitnis |#RenukaDaftardar | #RayaAbhankar | #YogeshSoman | @meghana_jadhav | @satishjambe2185 | @aakashpendharkar

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

अपघातात हात गमवलेल्या मुलीच्या या भूमिकेसाठी खूप शारीरिक-मानसिक तयारी करावी लागणार असल्याची कल्पना दिग्दर्शक प्रताप फड यांनी दिली होती. त्यामुळे दिग्दर्शकाला शरण जाऊन त्यांच्या मनातली भूमिका साकारायचं ऋताने ठरवलं आहे. त्यामुळे तिची मेहनत सिनेमात बघण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive