आज फादर्स डे. वडिलांचं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खास स्थान आहे. आपल्या प्रत्येक पावलामागे असलेला खंबीर आधार म्हणजे वडील. आयुष्यातील या सपोर्ट सिस्टीमचं खास कौतुक करण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. मराठी सेलिब्रिटींनीही त्यांच्या वडिलांसोबतचा खास फोटो शेअर करत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकू राजगुरु, शशांक केतकर, अपुर्वा नेमळेकर, स्मिता गोंदकर, भार्गवी चिरमुले, केतकी माटेगावकर यांनी वडिलांसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.