सोनाली कुलकर्णीने मेट्रोने प्रवास करत चाहत्यांसोबत शेअर केले ‘सो कूल’ फोटो

By  
on  

सेलिब्रिटींची लाईफस्टाईल सामान्य व्यक्तीपेक्षा आरामदायी असली तरी त्यांनाही अनेकदा सामान्य व्यक्तीला भेडसावणा-या अडचणींचा सामना करावा लागतो. मुंबईतील कलाकारांना ट्रॅफिकचा त्रास तसा नवीन नाही. पण सोनाली कुलकर्णीला मात्र या ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागला. मग काय अंधेरीतील ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या सोनालीने गाडी तिथेच सोडली आणि थेट मेट्रोस्टेशन गाठलं. अंधेरी ते वर्सोवा हा प्रवास सोनालीला मेट्रोने करावा लागला.

विशेष म्हणजे सोनालीने देखील हा अनुभव कटकत न समजता मस्त एंजॉय केला. या प्रवासादरम्यान चाहत्यांसोबत सेल्फीही घेतली. विशेष म्हणजे इच्छित स्थळी वेळेत पोहोचल्याचं समाधानही सोनालीला मिळालं. ही बाब चाहत्यांशी शेअर करत मेट्रो प्रवासाचा अनुभव सुखद असल्याचंही तिने नमूद केलं आहे.

https://twitter.com/sonalikulkarni/status/1083337759589351424

 

Recommended

Share