ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन

By  
on  

आपल्या सदाबहार अभिनयाने आणि विनोदांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झालं आहे. जाहीरात, सिनेमे, मराठी तसेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवर विविध भूमिकांधून त्यांनी आपला ठसा उमटवला. ते 83 वर्षांचे होते.

आजच्या पिढीला तर त्यांची खास ओळख करुन सांगायचं झालं तर 'जब वुई मेट' या सुपरहिट सिनेमामधील स्टेशन मास्तर आणि त्यांचा गाजलेला संवाद 'एक अकेली लडकी खुली हुई तिजोरी की त-हा होती है'.

https://www.facebook.com/chandrashekhar.gokhale.7/posts/2212770758759362

महेश मांजरेकर दिग्दर्शित लालबाग परळ, शिक्षणाचा आयचा घो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. मूळचे नागपूरचे असलेल्या प्रधान यांना कुटुंबातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. प्रधान यांच्या आई मालतीताई प्रधान नाटकांतून काम करायच्या.

https://www.instagram.com/p/BshPS3ZBXUf/

 

अभिनेता सुबोध भावे यांनेसुध्दा किशोर प्रधान यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांना श्रध्दांजली वाहिली.

Recommended

Share