अखेर सुव्रत जोशीला "ब्रेड पावला"!

By  
on  

सध्या लॉकडाऊन काळात जवळपास तीन महिने घरात बसून वैतागलेले आणि कंटाळलेले आपले लाडके कलाकार काय करतील आणि कुठली कला दाखवतील याचा काही नेम नाही. आता हेच पाहा ना, अभिनेता सुव्रत जोशीने थेट लंडनहून शाब्दिक कोट्या करत आपण बेकर असल्याची व्यथा नुकतीच सोशल मिडीयावर मांडलीय. 

 

अशी आहे ''बेकर'' सुव्रत जोशीची व्यथा, पण मस्का लावलेली 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ये मेरा पाव हैं! गेल्या काही दिवसात मी "बेकार" असल्याने, "बेकर" व्हायचे ठरवले. (वास्तविक ही अत्यंत वाईट शाब्दिक कोटी मी टाळू शकलो असतो,पण माझ्यातील चिवट आणि चिप नटाने माझ्यातील लेखकावर मात करून ही "ऍडिशन" घेतली आहे) दोन आठवड्यापूर्वी लंडन मधील एका तुर्की दुकानात बाजरी मिळाल्यावर डोळ्यात डेड सी एवढे खारट अश्रू दाटून आले आणि त्याची भाकरी बनवताना नंतर तेवढाच क्षारयुक्त घामही सुटला. कुठली बाजरी होती देव जाणे पण अनेक संस्कार करूनही त्याची मनासारखी भाकरी काही होईना.मग त्या पिठाचा पाव करायचे ठरवले. मी काहीही पदार्थ करताना improvise करत जातो. साखर टाळत असल्याने मध घालावा असे ठरले पण पुरेसा मध नव्हता. त्यामुळे आमच्या पोलिश मैत्रिणीकडून पोलिश मध घेतला. अमर च्या दौऱ्यासाठी अमेरिकेत असताना एका अत्यंत गोड यजमानांनी यीस्ट दिला होता. गेल्या आठवड्यात येथील एका आफ्रिकन गोष्टींचे दुकान चालवणाऱ्या अफगाणी काकांकडे पाकिस्तानी कंपनीची कसूरी मेथी मिळाली ती छान लागेल म्हणून ब्रेड मध्ये तीपण सरकवली. अमेरिकन यीस्ट,तुर्की बाजरी,पोलिश मध, ब्रिटिश अंडी,पाकिस्तानी मेथी आणि भारतीय कष्ट असा वैश्विक पाव आहे हा. सगळेजण मला याची कृती विचारत आहेत. तर अगदी इंटरनेट वर सर्च केल्यावर जी बाजरीच्या पावाची पहिली कृती असेल ती, असे मी सांगेन कारण मी अगदी सोपी कृती निवडतो. त्यात xanthan gum नावाचा एक पदार्थ टाकावा लागतो ज्यामुळे पीठ मळून येते, ते फक्त पहा. बाजरीच्या पिठात ग्लुटेन नसल्याने ते घालावे लागते. (ते शाकाहारी असते ) ब्रेड करताना माझी स्थिती लहान मुलासारखी झाली होती. दर पाच मिनिटाला मी माझी कणिक फुगली का? पाव जळत नाहीये ना? मीठ बरोबर झालंय ना हे पाहत होतो...पण अखेर "ब्रेड पावला"! खाणाऱ्याने हा खाऊन बोटं चाटली नाहीत किंवा अगदी माझे पाव पकडले नाहीत तरी मी पुन्हा हा बनवावा म्हणून मला मस्का नक्की मारू शकतो.

A post shared by Sula (@suvratjoshi) on

 

 

 

आपल्या मराठी कलाकरांच्या कल्पक विनोद बुध्दीची दाद द्यायलाच हवी आणि या पोस्टवरुन तर सुव्रत जोशीला मानाचा मुजराच. सखी गोखले आणि सुव्रत जोशी हे लॉकडाऊनचा संपूर्ण काळ लंडनमध्येच आहेत. तिथूनच ते थेट चाहत्यांच्या संपर्कात असतात. लाईव्ह सेशन्स, इन्स्टाग्राम असो किंवा मग मालिकेचं चित्रिकरण सब कुछ लंडन सें. 

Recommended

Loading...
Share