Photo: ओळखलंत का या चिमुरडीला ... आता गाजवतेय छोटा पडदा

By  
on  

सिंपल आणि मनमोहक लूक असणारी ही अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर छोटा पडदा गाजवते. अनेक मालिकांमधून तिने रसिकांच्या मनावर अधिाज्य गाजवलं आहे. या बालपणीच्या फोटोतही ती आत्ता इतकीच गोड आणि निरागस दिसतेय. ही अभिनेत्री आहे..... मृणाल दुसानिस. 

माझिया प्रियाला प्रित कळेना या झी मराठीवरच्या लोकप्रिय मालिकेतून मृणालने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. पदार्पणातच तिच्या मालिकेने यशोशिखर गाठलं. त्यानंतर अस्सं सासर सुरेख बाई ही तिची संतोष जुवेकरसोबतची मालिकाही प्रचंड गाजली. मृणाल सध्या ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या मालिकेत तिच्यासोबत शशांक केतकरही आहे. नेहमीप्रमाणेच दोघं चाहत्यांना आपलंस करतायत. 

 

साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणेच मृणालने साधं-सिंपल राहून आपल्या सौंदर्यांने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं 

 

 

खरोखरच अभिनेत्री असूनही मृणालने तिचा साधेपणा जपला आहे.

Recommended

Loading...
Share