अभिनेता सिद्धार्थ जाधवने या खास अंदाजात लेक स्वराला केलं विश

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर अ‍ॅक्टीव्ह असतो. आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी तो सोशल मिडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत शेअर करत असतो.  त्यात लाडक्या लेकीचा वाढदिवस असेल तर विचारायलाच नको. 
सिद्धार्थने लेक स्वराला 9 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. एक खास पोस्ट शेअर करत सिद्धार्थने या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तान्हुली स्वरा आणि आताची स्वरा या फोटोंचं कोलाज करून त्याने शेअर केलं आहे. 

 

 

तर आणखी एका पोस्टमध्ये स्वरा तिचा बर्थ डे केक कापतानाचा व्हिडियो शेअर केला आहे. बर्थ डे च्या पोस्टला कॅप्शन देताना सिद्धार्थ म्हणतो, ‘खुप मोठी हो... सदैव हसत.. आनंदी.. उत्साही रहा... .बाबा तर आहेच.. असणारच.. कायम.... lv u forever’ . सिद्धार्थ अनेकदा लेकींसोबत विविध फोटो व्हिडियो शेअर करत असतो.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday SWARA... lv uuuu forever . #swarajadhav #happybirthday...

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

 

 

Recommended

Loading...
Share