By  
on  

देवाभाईला भेटण्यासाठी सुरु झालीये डार्लिंग डीनची लगबग, पाहा फोटो

 'डॉक्टर डॉन' मालिकेतील श्वेता शिंदे आणि देवदत्त नागे यांची लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. श्वेता रंगवत असलेल्या डार्लिंग डीनच्या प्रेमात फक्त  देवाच नाही तर चाहतेसुध्दा पडले आहेत. पण लॉकडाऊनमुळे या मालिकेसोबत चाहत्यांना विरह सहन करावा लागला.  लॉकडाऊनमधून अनलॉकमध्ये आल्यानंतर मालिकांच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Precaution is better than cure... The show must go on . . #ZeeYuva #zee5marathi #DoctorDon #shwetashinde #shooting #actorslife

A post shared by Shweta Shinde (@shwetashinde_official) on

 

त्यामुळे डॉन आणि डीनची ही लव्हस्टोरी आता पुन्हा छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. श्वेता यांनी नुकताच सेटवरील फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांना मेक अप करत असलेली व्यक्ती पीपीई किट घालून मेक अप करताना दिसते आहे. सेटवरही जोरदार तयारी दिसून येत आहे. त्यामुळे आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सिद्ध होईल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive