'आपण आपल्यापुरतं तरी तेवत रहायला हवं......' , सांगतोय कुशल बद्रिके

By  
on  

सध्या सर्वत्रच उद्याची चिंता लागून राहिली आहे. हे करोना संकट, त्यात बेरोजगारी, उपासमारी अशी अनेक संकटं एकामागून येत आहेत. पण त्यावर धैर्याने आणि नेटाने मात करायला सिकायला हवं. खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागायला हवं. पुन्हा नवी सुरुवात करायला हवी. 

नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असणारा अभिनेता कुशल बद्रिकेने एक सुरेख पोस्ट नुकतीच केली आहे. त्याचा अर्थसुध्दा खुप सुरेख कुशलने समजावून सांगितला. कुशल सांगतो, "  आपण आपल्यापुरतं तरी तेवत रहायला हवं, त्याने सभोवती पसरलेला अंधार संपणार नाही कदाचित, पण आपलं “जळून“ जाण हे आपल्यापुरताचा अंधार “ऊजळून” टाकणारं होतं !
हे एवढ समाधानही पुरेस आहे की "

या करोनाने प्रभावित झाला नसेल अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. करोनाने प्रत्येकाच्याच आर्थिक, सामाजिक वैयक्तिक आरोग्यावर परिणाम केला आहे. करोनाने अनेकांच्या हातातील कामही थंड पडलं आहे. मनोरंजन क्षेत्राशी अवस्था याहून वेगळी नाही. लॉकडाऊनमुळे अनेक बॅकस्टेज कामागारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण आता पुनश्च हरिओम म्हणत पुन्हा एकदा सर्वजण योग्य खबरदारी घेत कामाचा श्रीगणेशा करतायत. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळो, हीच सदिच्छा.  

Recommended

Loading...
Share