By  
on  

आर्या आंबेकर म्हणते, या फोटोंचं क्रेडिट माझ्या धाडसी मित्र-मैत्रिणींना जातं

अभिनेत्री गायिकाआर्या आंबेकर सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती आठवणी शेअर करणारे फोटो पोस्ट करत असते. आताही तिने सोशल मिडियावर कॉलेजमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. एम.ए पार्ट वन आणि पार्ट टू च्या व्हायवा दरम्यानचे फोटो तिने यावेळी शेअर केले आहेत. 

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आर्या म्हणते, ‘मी माझ्या काही कॉलेजमधील आवडते फोटो मी शेअर करत आहेत. पहिला फोटो हा एम.ए पार्ट वनच्या व्हायवा दरम्यानचा आहे. तर दुसरा फोटो पार्ट टू च्या प्रेझेंटेशनवेळचा आहे. अर्थात परिक्षेदरम्यानही फोटो काढणा-या माझ्या मित्र-मैत्रिणींना या फोटोचं क्रेडिट द्यायला हवं’ असंही तिने म्हटलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive