By  
on  

सुव्रत जोशी या पदार्थाचा फोटो शेअर करत म्हणतो,

अभिनेता सुव्रत जोशी सध्या लंडनमध्ये आहे. यादरम्यान तो अनेक नवनवे प्रयोग करताना दिसत आहे. यासोबतच तो सोशल मिडियाच्या माध्यमातून चक्क सातासमुद्रा पलीकडूनही चाहत्यांशी संवाद साधतो आहे. नुकताच त्याने सोशल मिडिया अकाउंटवर एक हटके फोटो शेअर केला आहे.  या फोटोसोबत भलं मोठं कॅप्शनही जोडलं आहे. तो म्हणतो,

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

काल माझ्या आईला आणि मलाही अतिशय आवडणारा "लछ्छा पराठा" करायचा प्रयत्न मी केला. माझी आई त्याला "लज्जा पराठा" म्हणते. भारतातल्या भारतात सुद्धा इतक्या खाद्यसंस्कृती एकत्र नांदतात की पदार्थ एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात गेल्यावर असे अपभ्रंश होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्याची "लज्जा" वाटून न घेता "मज्जा" घ्यावी. तसंही 'प' चा 'मा' केला तर पराठ्याचा मराठा व्हायला कितीसा वेळ लागणार. असो. हा शब्दच्छल संपवून पदार्थांच्या आयात निर्यातीमुळे होणाऱ्या खऱ्या छळाकडे वळतो. "पंजाबी" हॉटेल मध्ये मिळणारी "व्हेज कोल्हापुरी" हे त्याचेच एक उदाहरण! "व्हेज कोल्हापुरी" हा पदार्थ पंजाबी मेनू मध्ये ज्याने घुसडला, त्याला चांगला हासडून कोल्हापुरी चपलेनेच चोपला पाहिजे. पंजाबी पदार्थाच्या नावाखाली महाराष्ट्रात मिळणारे पदार्थ याइतका मोठा घोटाळा भारताच्या इतिहासात हर्षद मेहातानेही केलेला नाही. "चायनीज" च्या नावाखाली भारतात मिळणारे काही पदार्थही त्याच कुळातले! त्यातील काही पदार्थ हे इतके भयानक असतात की ते खाण्यापेक्षा चायनीज लोक खातात तसे काही भयानक प्राणी खाणे परवडले. त्या जेवणात वापरला जाणारा लाल रंग हा इतका लाल असतो की मंचुरीयनच्या प्लेट ह्या सिग्नल वर लाल दिवा म्हणून लटकवता येतील. हाच लाल रंग चीन स्वतःचे लाल झेंडे रंगवायला सुद्धा वापरत असणार अशी शंका मला अनेकदा येते, इतका तो लाल असतो. चायनीज गोष्टी बॅन करताना काही चायनीज पदार्थही बॅन झाले तर किती बरं होईल. असा जेवणाचा ल.सा.वी. इथे परदेशात सुद्धा काढला जातो. लंडन मध्ये भारतीय पदार्थ या नावाखाली रेस्तराँट्स मध्ये चिकन चेट्टीनाड पासून चिकन चंगेझी पर्यंत सर्व पदार्थ एकाच छताखाली बेधडक विकले जातात. बहुतांश इंग्लिश लोकांना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा भारत बहुतेक एकसारखाच वाटतो. लाल मिरची पहिली तरी गोऱ्यांच्या गालावर त्यापेक्षा गडद लाल रंग चढतो, त्यामुळे त्यांच्या चवीला रुचेल असे फिकेपण इथे भारतीय जेवणात आणावे लागते. नाकातून आलेलं पाणी पुसत आपल्याकडच्या पाण्यापेक्षाही सपक 'कऱ्या' गोरे सर्रास चापताना दिसतात. बरं असा ल.सा.वि. काढलेला मेनू असल्याने ते बापुडे कशाही बरोबर काहीही मागवतात. त्यामुळे बटर चिकन बरोबर डोसा खाताना आणि सांबाराच्या तीन वाट्या पोटात गेल्यावर लस्सी ढोसताना ते कळत नकळत किती मोठा मोठा सांस्कृतिक अपराध करत आहेत याची जाणीव त्यांना होत नसावी. त्यांचे हे अपराध पोटात घेणं मला तरी शक्य नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रातर्विधी उरकताना त्यांच्या पोटानेच त्याची शिक्षा त्यांना द्यावी असे पोटातून वाटून जाते. #london #paratha

A post shared by Sula (@suvratjoshi) on

 

काल माझ्या आईला आणि मलाही अतिशय आवडणारा "लछ्छा पराठा" करायचा प्रयत्न मी केला. माझी आई त्याला "लज्जा पराठा"  म्हणते. भारतातल्या भारतात सुद्धा इतक्या खाद्यसंस्कृती एकत्र नांदतात की पदार्थ एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात गेल्यावर असे अपभ्रंश होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्याची "लज्जा" वाटून न घेता "मज्जा" घ्यावी. तसंही 'प' चा 'मा' केला तर पराठ्याचा मराठा व्हायला कितीसा वेळ लागणार. असो. हा शब्दच्छल संपवून पदार्थांच्या आयात निर्यातीमुळे होणाऱ्या खऱ्या छळाकडे वळतो. "पंजाबी" हॉटेल मध्ये मिळणारी "व्हेज कोल्हापुरी" हे त्याचेच एक उदाहरण! "व्हेज कोल्हापुरी" हा पदार्थ पंजाबी मेनू मध्ये ज्याने घुसडला, त्याला चांगला हासडून कोल्हापुरी चपलेनेच चोपला पाहिजे.

पंजाबी पदार्थाच्या नावाखाली महाराष्ट्रात मिळणारे पदार्थ याइतका मोठा घोटाळा भारताच्या इतिहासात हर्षद मेहातानेही केलेला नाही. "चायनीज" च्या नावाखाली भारतात मिळणारे काही पदार्थही त्याच कुळातले! त्यातील काही पदार्थ हे इतके भयानक असतात की ते खाण्यापेक्षा चायनीज लोक खातात तसे काही भयानक प्राणी खाणे परवडले. त्या जेवणात वापरला जाणारा लाल रंग हा इतका लाल असतो की मंचुरीयनच्या प्लेट ह्या सिग्नल वर लाल दिवा म्हणून लटकवता येतील. हाच लाल रंग चीन स्वतःचे लाल झेंडे रंगवायला सुद्धा वापरत असणार अशी शंका मला अनेकदा येते, इतका तो लाल असतो. चायनीज गोष्टी बॅन करताना काही चायनीज पदार्थही बॅन झाले तर किती बरं होईल. असा जेवणाचा ल.सा.वी. इथे परदेशात सुद्धा काढला जातो.

लंडन मध्ये भारतीय पदार्थ या नावाखाली रेस्तराँट्स मध्ये चिकन चेट्टीनाड पासून चिकन चंगेझी पर्यंत सर्व पदार्थ एकाच छताखाली बेधडक विकले जातात. बहुतांश इंग्लिश लोकांना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा भारत बहुतेक एकसारखाच वाटतो.  लाल मिरची पहिली तरी गोऱ्यांच्या गालावर त्यापेक्षा गडद लाल रंग चढतो, त्यामुळे त्यांच्या चवीला रुचेल असे फिकेपण इथे भारतीय जेवणात आणावे लागते. नाकातून आलेलं पाणी पुसत आपल्याकडच्या पाण्यापेक्षाही सपक 'कऱ्या' गोरे सर्रास चापताना दिसतात. बरं असा ल.सा.वि. काढलेला मेनू असल्याने ते बापुडे कशाही बरोबर काहीही मागवतात. त्यामुळे बटर चिकन बरोबर डोसा खाताना आणि सांबाराच्या तीन वाट्या पोटात गेल्यावर लस्सी ढोसताना ते कळत नकळत किती मोठा मोठा सांस्कृतिक अपराध करत आहेत याची जाणीव त्यांना होत नसावी. त्यांचे हे अपराध पोटात घेणं मला तरी शक्य नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रातर्विधी उरकताना त्यांच्या पोटानेच त्याची शिक्षा त्यांना द्यावी असे पोटातून वाटून जाते

Author

Recommended

PeepingMoon Exclusive