By  
on  

...म्हणून अभिनेता सुबोध भावेला झालाय आनंद

गेले दोन तीन महिने सर्व मालिका सिनेमांचं चित्रिकरण करोना संकटामुळे ठप्प होतं. त्यामुळे साहजिकच सामान्यांसारखे सलिब्रिटीसुध्दा आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत होते, पण तरीही त्याततसुध्दा ते घरुनच ऑनलाईन -व्हर्च्युअल एन्टरटेन्मेट करुन चाहत्यांचं मनोरंजन करतच होते. त्यालासुध्दा प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. पण आता आणखी किती काळ घरी बसायचं. योग्य ती खबरदारी घेऊन घराबाहेर पडावंच लागणार आहे. 

योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम व सर्व अटी पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याची मान्यता राज्यसरकारने सिनेसृष्टीला दिली. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला. त्यामुळे ब-याच काळानंतर आपल्या सेटवर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचून कलाकारांना अवर्णनीय आनंद झाला आहे, असाच आनंद मराठीतला आघाडीचा अभिनेता सुबोध भावेलासुध्दा झाला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

खूप दिवसांनी काम केल्याचा आनंद!

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

प्रदीर्घ काळानंतर आपल्या कामाचा श्रीगणेशा करुन अभिनेता सुबोध भावोला खुप आनंद झाला आहे. यानिमित्ताने सुरेख फोटोसुध्दा सोशल मिडीयावर पोस्ट केला.  तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, खूप दिवसांनी काम केल्याचा आनंद!. यावर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरश:वर्षाव सुरु केला आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive