By  
on  

राधिका मसालेच्या सर्वेसर्वा म्हणजेच अभिनेत्री अनिता दातेचे हे Stunning फोटो पाहिलेत का?

गुरुनात सुभेदारचं घर आणि मुलाचा योग्य सांभाळ करणारी आणि तितकंच आपला व्यवसायसुध्दा यशोशिखरावर नेऊन ठेवणारी राधिका मसालेची सर्वेसर्वा म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते. माझ्या नव-याची बायको या मालिकेमुळे अनिता महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.चला तर पाहूयात तुमच्या लाडक्या राधिकाचे काही मनमोहक फोटो, जे पाहून तुम्ही नक्कीच घायाळ व्हाल. 

गेली अनेक वर्ष सुरु असलेली माझ्या नव-याची बायको ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अग्रेसर आहे. तसंच प्रेक्षकांचंसुध्दा मालिकेला भरभरुन प्रेम मिळतंय. 

 

 

एक आदर्श गृहिणी, एक आदर्श पत्नी, एक आदर्श आई आणि आता एक आदर्श उद्योजिका अशा सर्व भूमिका ती राधिका म्हणून लिलया पार पाडते. 

 

  राधिकाला पारंपारिक कपड्यांचीच जासत आवड असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन पाहायला मिळतं

 

 अनीता दाते केळकर ही आगामी सिनेमा 'मी वसंतराव'मध्ये  हिंदुस्तानी संगीत शैलीतील प्रसिध्द गायक  डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे.

 

अनितावर नेहमीच प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करतात. सर्व महिलावर्गाला तर आपलीच छबी तिच्यात दिसते. 

 

राणी मुखर्जी स्टारर आणि सचिन कुंडलकर दिग्दर्शित अय्या या बॉलिवूडपटात एका अनोख्या व्यक्तिरेखेत अनिता पाहायला मिळाली होती.

 

 

  वेस्टर्न असो किंवा पारंपारिक अनिता प्रत्येक आऊटफिटमध्ये खासच दिसते. 

 

 

 

गुरुनाथला धडा शिकवणारी आणि नेहमीच सत्याची साथ देणारी राधिका अनिताने छोट्या पडद्यावर अप्रतिम साकारली

 

सर्वांनाच आता लॉकडाऊननंतर ब-याच काळाने माझ्या नव-याची बायको मालिका आता १३ जुलैपासून रसिकांच्या भेटीला येतेय त्यामुळे नवीन भागांची उत्सुकता लागून राहिली  आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive