सोनाली कुलकर्णी विचारते, काय असतं खिडकीच्यापल्ल्याड?

By  
on  

लॉकडाऊनचा काळ आपण सर्वच तीन महिन्यांच्यावर घरी आहोत. सेलिब्रिटींचीसुध्दा सामान्यांसारखीच अवस्था आहे. आता घरी बसून, आराम करुन, घरकामं आवरुन आणि विविध छंद जोपासून कंटाळा यायला लागला आहे आणि बाहेरचं जग आता आपल्याला खुणावू लागलं आहे. कधी  एकदा या बंदीस्त वातावरणातून बाहेर पडतोय असं प्रत्येकालाच वाटू लागलं आहे. याचं परस्थितीवर आधारित एक प्रश्न  अप्सरेला पडला आहे. 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चाहत्यांना विचारते, " काय असतं.... #खिडकीच्यापल्याड ??? #lockdown ने आपल्या सगळ्यांना बंदिस्त केलंय आणि आपण सगळेच #खिडकीच्यापल्याड बघण्याचा प्रयत्न करतोय...मी ही मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शाधतेय...तुम्ही सगळ्यात जास्त काय miss करताय ?" 

 

सोनालीच्या या प्रश्नावर चाहत्यांनी कॉंमेट्समध्ये आपल्या प्रतिक्रीयांचा वर्षीव सुरु केला आहे. खरं तर हा प्रश्न विचारण्या मागचा सोनालीचा मानस म्हणजे ती चाहत्यांसाठी लवकरच एक व्हिडीओ स्वरुपातलं गाणं घेऊन येते.प्रसिध्द  म्युझिक कंपनी व्हिडीओ पॅलेस या गाण्याची निर्मिती करत आहे. 

चाहत्यांसह सर्वांनाच आता सोनाली कुलकर्णीच्या खिडकीच्या पल्ल्याड ....या नव्या गाण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Recommended

Loading...
Share