अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारणारा हा अभिनेता रमला आहे शेतीमध्ये

By  
on  

गेले तीन महिने प्रत्येकजण लॉकडाऊन आहे. नेहमीची धावपळ, काम यातून प्रत्येकाला लॉकडाऊनने बाजूला केलं आहे. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. या सेलिब्रिटींनी नेहमीच्या झगमगाटी जीवनापेक्षा काहीसं हटके जीवन स्विकारलं आहे. त्यापैकीच एक आहे अभिनेता भरत जाधव. पडद्यावर अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारणारा हा कलाकार सध्या शेतीमध्ये रमला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Back to Basic..! #शेती #वृक्षारोपण

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on

 

भरतने सोशल मिडियावरून एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये तो स्वत: शेतीची कामं करताना दिसत आहे. ‘बॅक टू बेसिक’ असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. यावेळी पत्नी सरिता जाधवही त्याला मदत करत आहे. या व्हिडियोच्या शेवटी ‘क्षेत्र कोणतंही असो कष्ट व प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे.’ असं कॅप्शनही दिलं आहे.

Recommended

Loading...
Share