संतोष जुवेकरने हिच्यासोबत जुळवले आहेत ’36 गुण’ पाहा फोटो

By  
on  

भोसले नंतर अभिनेता संतोष जुवेकर आणखी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 36 गुण असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं दुसरं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री पुर्वा पवार झळकणार आहे.संतोषसोबत या सिनेमात पुष्कर श्रोत्री देखील झळकणार आहे.  या पोस्टरमध्ये पुर्वा दिसत आहे तर तिच्या मागे संतोष दिसत आहे.

 

 

या पोस्टला कॅप्शन देताना संतोष म्हणतो, ‘आपल्या घरात बसून बघा घरातली गोष्ट..... जे तुमचं तेच आमचं.’  या पोस्टवरून हा सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार का अशी शंका मनात आल्याशिवाय रहात नाही. हा सिनेमा समीत कक्कड दिग्दर्शित करत आहेत. समीत यांनी यापुर्वी 'हाफ तिकीट', 'आयना का बायना' यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केलं आहे.

Recommended

Loading...
Share