ही मराठी अभिनेत्री म्हणते, नजरोंका खेल? वो तो बरसोंसे खेलते आ रहे है!

By  
on  

आपल्या बबली लुकमधून आणि गोड अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. तुला पाहते रे मालिकेतील ईशा म्हणून अभिनेत्री गायत्री दातार महाराष्ट्राच्या घराघरात आणि रसिकांच्या मनामनांत पोहचली. या मालिकेतल्या तिच्या पदार्पणातीलच व्यक्तिरेखेतून तिने रसिकांची मनं जिंकली. युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिएलिटी शोमधून गायत्रीच्या डान्सचा जलवासुध्दा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. 

गायत्रीचे विविध फोटोशूट नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असतात. प्रत्येक लुकमध्ये ती खासच दिसते. 

 

गायत्रीचं अवखळ आणि निरागस हास्य नेहमीच चाहत्यांना भावतं. 

 

गॉगल लावून आणि डोक्यावर हटके पध्दतीने औढणी बांधून गायत्री या लुकमध्ये खुप कूल दिसतेय. 

 

भाव हम देते नहीं!...अकड़ हम सहते नही!  ... हा मेसेज देत गायत्रीने सोशल मिडीयावर धम्माल उडवून दिली आहे. 

Recommended

Loading...
Share