By  
on  

सुव्रत जोशीला आठवण झाली "भैया और थोडा तिखा बनाओ ना!" अशी तक्रार करणाऱ्या तमाम स्री वर्गाची!

पाणीपुरी म्हटलं की, तुमच्या आमच्या सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि त्यातही पाणीपुरी आपल्याकडच्या मुलींचा वीक पॉईंट समजला जातो. तमाम महिला वर्गाचा चटपटीत पाणीपुरी हा आवडता खाद्यपदार्थ. त्या कधीही आणि कुठेही त्यावर ताव मारु  शकतात. आपल्या भन्नाट पोस्टसाठी प्रसिध्द असलेला, मराठी अभिनेता सुव्रत जोशीने त्याच्या लंडनच्या घरी नुकताच पाणीपुरीचा बेत आखला होता आणि त्याला आपल्या भारतीय महिलावर्गाची आठवण झाली. 

सुव्रत म्हणतो, " काल भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय खाद्य, "पाणी पुरी" लंडन मधील घरी बनवण्यात आले. ज्या पदार्थाला भारतीय देवांप्रमामाणेच प्रत्येक प्रांतात विविध रूपे आणि नावे आहेत. गोल गप्पे, पुचका,पानी के पताशे,टिक्की, फुलकी वगैरे वगैरे. आणि भारतात कुठल्याही गोष्टीचा होतो तसा पाणी पुरी हाही अस्मितेचा प्रश्न होतो. आमच्याच प्रांतातली पुरी कशी भारी यावर अनेक तास वाद फुलताना आणि कुठलाही निर्णय ना झाल्याने तोंड फुगवताना मी पाहिले आहे. पण एकता येते, ती त्या पुरीचे, पुचक्याचे,टिक्कीचे सेवन करताना स्त्री वर्गाच्या मुखातून होणाऱ्या गजरामुळे! प्रत्येक भारतीय स्त्रिच्या तोंडात पुरी फुटत असतानाच काही शब्द तोंडातून फुटतात. भले त्यांची भाषा वेगळी असो पण गर्भार्थ एकच असतो. तेव्हा काल तिखट पाणी पुरी बनवणाऱ्या सर्व गोड भैय्यांची आठवण झालीच पण सगळ्यात जास्त आठवण झाली ती नाकातून एक वेगळेच पाणी वाहत असताना,तोंड पुरीसारखे फुगलेले असताना आणि गाल तिखटासारखे लाल झालेले असतानाही सतत "भैया और थोडा तिखा बनाओ ना!" अशी तक्रार करणाऱ्या तमाम स्री वर्गाची! प्रत्येक पुरीगणिक ही तक्रार वाढतच जाते. शेवटी हातगाडीवर लटकलेल्या लिंबू मिर्चीमधील मिरची काढून त्या पाणी पुरीत टाकायची तेवढी बाकी असते आणि तरीही ह्यांचे समाधान होत नाही.असो. व्हिडिओ बघा,लाईक मारा आणि त्या मैत्रिणीला धप्पा द्या/टॅग करा जी अशी "चटोऱ्या" पाणी पुरीची मागणी करते."

 

पाहा हा धम्माल व्हिडीओ 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Every Indian Girl on this planet at any Paani Puri stall is like.... काल भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय खाद्य, "पाणी पुरी" लंडन मधील घरी बनवण्यात आले. ज्या पदार्थाला भारतीय देवांप्रमामाणेच प्रत्येक प्रांतात विविध रूपे आणि नावे आहेत. गोल गप्पे, पुचका,पानी के पताशे,टिक्की, फुलकी वगैरे वगैरे. आणि भारतात कुठल्याही गोष्टीचा होतो तसा पाणी पुरी हाही अस्मितेचा प्रश्न होतो. आमच्याच प्रांतातली पुरी कशी भारी यावर अनेक तास वाद फुलताना आणि कुठलाही निर्णय ना झाल्याने तोंड फुगवताना मी पाहिले आहे. पण एकता येते, ती त्या पुरीचे, पुचक्याचे,टिक्कीचे सेवन करताना स्त्री वर्गाच्या मुखातून होणाऱ्या गजरामुळे! प्रत्येक भारतीय स्त्रिच्या तोंडात पुरी फुटत असतानाच काही शब्द तोंडातून फुटतात. भले त्यांची भाषा वेगळी असो पण गर्भार्थ एकच असतो. तेव्हा काल तिखट पाणी पुरी बनवणाऱ्या सर्व गोड भैय्यांची आठवण झालीच पण सगळ्यात जास्त आठवण झाली ती नाकातून एक वेगळेच पाणी वाहत असताना,तोंड पुरीसारखे फुगलेले असताना आणि गाल तिखटासारखे लाल झालेले असतानाही सतत "भैया और थोडा तिखा बनाओ ना!" अशी तक्रार करणाऱ्या तमाम स्री वर्गाची! प्रत्येक पुरीगणिक ही तक्रार वाढतच जाते. शेवटी हातगाडीवर लटकलेल्या लिंबू मिर्चीमधील मिरची काढून त्या पाणी पुरीत टाकायची तेवढी बाकी असते आणि तरीही ह्यांचे समाधान होत नाही.असो. व्हिडिओ बघा,लाईक मारा आणि त्या मैत्रिणीला धप्पा द्या/टॅग करा जी अशी "चटोऱ्या" पाणी पुरीची मागणी करते. #panipuri #chaat #bhaiya #golgappe #tikki #puchka

A post shared by Sula (@suvratjoshi) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive