मराठी सेलिब्रिटीनींही केली अमिताभ यांच्या उत्तम आरोग्याची कामना, केला हा मेसेज शेअर

By  
on  

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना Covid-19 ची लागण झाल्याचे समजताच फॅन्समध्ये एकच अस्वस्थता आहे. देशाच्या कानाकोप-यातून बिग बींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अनेक मराठी सेलिब्रिटींनीही बिग बी यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत लवकर बरं व्हावं यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता सुबोध भावेने ‘ या संकटातूनही लवकरच बाहेर याल’ अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

 

 

 रितेश देशमुखनेही ‘तुम्ही लवकर बरं व्हावं ही प्रार्थना’ असं ट्वीट अमिताभ आणि अभिषेक दोघांसाठी केलं आहे. 

 

 

 

 

तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकिन है’ अशी पोस्ट करत बिग बी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. अमिताभ यांना covid-19 ची  प्राथमिक लक्षणं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

 

 

Recommended

Loading...
Share