By  
on  

विज्ञान आणि भय यांची सांगड घालणारा सिनेमा ‘उन्मत्त’, पाहा अचंबित करणारा ट्रेलर

मराठीत साय फाय किंवा सायकॉलॉजिकल थ्रिलर फार बनत नाहीत अशी ओरड नेहमी सुरु असते. पण हा समज ‘उन्मत्त’ हा सिनेमा खोटा ठरवेल यात शंका नाही.

स्लीप पॅरेलिसिस या संकल्प्नेवर आधारित असलेला हा सिनेमा एका नव्या जगाची ओळख रसिकांना करून देतो. राकाही कॉलेज युवकांवर आधारित असलेली ही स्टोरी सिनेमाला फ्रेश टच देते.

या सिनेमात भय आहे, प्रेम आहे, विज्ञान आहे आणि थरारही आहे त्यामुळे चाहत्यांना काही हटके देण्यात हा सिनेमा यशस्वी ठरतो का ते कळेल लवकरच.

या सिनेमाची निर्मिती राजेंद्र खैरे यांनी केली असून सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन, महेश राजमाने यांनी केलं आहे. या सिनेमात आरुषी, विकास बांगर, पूर्णिमा दे, प्रसाद शिक्रे, संदीप श्रीधर व संजय ठाकूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा २२ फेब्रुवारी २०१९ मध्ये रिलीज होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=NvMQX4RRrJM

Recommended

PeepingMoon Exclusive