‘तू दिलेली ही शिकवण कधीच विसरणार नाही’; निळू फुलेंच्या लेकीची भावूक पोस्ट

By  
on  

बाई वाड्यावर या म्हणत संपू्र्ण सिनेसृष्टीत दरारा निर्माण करणारे अषटपैलू अभिनेते म्हणजे निळू फुले. मराठी सिनेविश्वातलं निळू फुलेंचं योगदान खुप मोठं आहे.  ११ वर्षांपूर्वी १३ जुलै रोजी ते हे जग सोडून गेले.  त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 

‘बाबा… आज तुला जाऊन ११ वर्षे झाली. शरीराने लांब कुठेतरी गेलास पण मनाने अजूनही माझ्याबरोबर आहेस आणि राहशील आणि सतत सांगत राहशील की नन्या बाकी कशीही रहा, कुठेही रहा पण समाजाचं आपण देणं लागतो हे विसरू नकोस. डोंट वरी बाबा, तू दिलेली माणुसकीची ही शिकवण मी कधीही विसरणार नाही.. आय लव्ह यू बाबा’, अशा शब्दांत गार्गीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.  

 

 

अभिनेत्री गार्गी फुले ही लोकप्रिय मालिका तुला पाहते रेमधील इशाची आई म्हणून घराघरांत पोहचली. ईशाची आई सौ. निमकर यांची भूमिका खुपच सशक्त साकारत गार्गी यांनी मनं जिंकली.

Recommended

Loading...
Share