माय वॉटर बॅंकचं उद्घाटन, चिन्मय उदगीरकरने मानले नाशिकचे पोलिस उपायुक्त विश्वास नांगरे -पाटील यांचे आभार

By  
on  

पाणी हे जीवन आहे. पाणी वाचवलं तरच आपण आपलं जीवन वाचवू शकतो. दुष्काळावर मात करण्यासाठी नाना प्रयत्न सुरू आहेत. पण या टंचाईवर मात करू शकणारं एक शक्य होणारं    उत्तर म्हणजे  पाण्याची बँक. पावसाचा थेब अन थेंब जमा करुन तो जेव्हा कधीही पाणी टंचाई भासेल तेव्हा योग्य पध्दतीने त्याचा वापर करणं आज काळाची गरज आहे. 

मालिका आणि सिनेमांमधला लाडका अभिनेता चिन्मय उदगीरकरने नुकतंच पावसाचं पाणी साठवण्यासाठी वॉटर बॅंक चळवळीचं उद्घाटन केलं आहे. नाशिकमध्ये या वॉटर बॅंकचं उद्धघाटन प्रसंगी खास नाशिकचे  पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलसुध्दा उपस्थित होते. चिन्मय हा मूळचा नाशिकचा रहिवासी आहे. 

चिन्मयने या पाणी बॅंक कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावरुन नुकतेच शेअर केले आहेत. 

 

 

 

Recommended

Loading...
Share