By  
on  

जुन्याच शनायाचा हा नवा नखरा पाहिलात का, आता गुरुनाथसोबत कोणती नवी खेळी खेळणार ?

माझ्या नव-याची बायको मालिकेतली जुनी शनाया पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक करतेय म्हटल्यावर अवघ्या छोट्या पडद्यावर एकच चर्चा रंगली. प्रेक्षकांमध्येसुध्दा सर्वत्र शनायाबद्दलच कुजबूज ऐकू आली.लॉकडाऊननंतर ब-याच कालावधीने मालिकांचे नवे भाग सुरु होतायत आणि त्यात पुन्हा जुनीच शनाया नव्या थाटात आणि त्याच बाजात परततेय म्हटल्यावर मालिकाविश्वात जणू खळबळच उडाली. 

माझ्या नव-याची बायको मालिकेच्या सेटवरुन शनाय फेम अभिनेत्री रसिका सुनिलने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यात स्लिव्हलेस ब्लाऊज आणि गर्द हिरव्या साडीत ती खुपच मनमोहक दिसतेय. यावेळस शनाया आता कोणती खेळी गुरुनाथसोबत खेळणा्र याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

राधिका, गुरू आणि शनाया या प्रेमत्रिकोणाच्या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत युवा पिढीचं नेतृत्व करणारी आणि बेधुंद व मनोसक्त वागणारी शनाया नेहमीचं पसंतीस उतरते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

 

भूमिका जरी निगेटिव्ह असली तरी पडद्यावर ती तंतोतंत साकारुन रसिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive