लाडके भाऊ कदम मुलांचा अभ्यास कसा घेतायत जाणून घ्या, पाहा हा भन्नाट व्हिडीओ

By  
on  

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लाडके विनोदवीर भाऊ कदम यांच्या धम्माल विनोदांचे आपण सर्वचजण चाहते आहोत. पण घरी ते कसे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांचा अभ्यास ते कसे घेतात हे तुम्हालासुध्दा जाणून घ्यायची उत्सुकता नक्कीच असेल ...अहो मग वाट कसली पाहताय, पाहा हा व्हिडीओ. 

भाऊ कदम मुलांचा अभ्यास घ्यायला मोठ्या थाटात बसले आणि त्यांना स्पेलिंग विचारुन भांडावून सोडलं...पण ऐकतील ती मुलं कसली... त्यांनीच भाऊंना एक स्पेलिंग विचारुन सळो कि पळो करुन टाकलं....मग भाऊंनी घाबरुन मुलांना आईला हे सांगू नका अशी धम्माल ताकीद दिली. 

भाऊ कदम आणि त्यांच्या मुलांचा हा भन्नाट अभ्यासाचा व्हिडीओ पाहून तुमचीही हसून हसून पुरेवाट लागेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial) on

Recommended

Loading...
Share