By  
on  

गायिका म्हणून गाण्याचा प्रत्येक प्रकार गायची इच्छा आहे : आर्या आंबेकर

‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून सिनेसृष्टीला मिळालेला गोंडस चेहरा म्हणजे गयिका, अभिनेत्री आर्या आंबेकर. आर्या एका उत्तम गायिका आहेच पण ती चांगली अभिनेत्री देखील आहे. तिने कथ्थकचं शिक्षण देखील घेतलं आहे. लिटील चॅम्प या कार्यक्रमातून प्रकाशझोतात आलेल्या आर्याने अभिनय बेर्डेसोबत सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

पण अभिनयात करीअर करत असूनही आर्याने गाणं सोडलेलं नाही. आर्याने नुकतीच एक लावणी गायली आहे. तिने लावणी हा गायन प्रकार पार्श्वगायक म्हणून पहिल्यांदाच गात असल्याची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली.

https://www.instagram.com/p/Bs63B1rnTD_/?utm_source=ig_web_copy_link

आर्याने कोणत्या सिनेमासाठी लावणी गायली हे मात्र गुलदस्त्यात ठेवलं आहे. पण हे चाहत्यांना लवकरच सांगेन असं पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे चाहते तिच्या पुढच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहतील यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive