कानाला खडा या कार्यक्रमात यावेळी असणार पाहुणी राखी सावंत, पाहा प्रोमो

By  
on  

झी मराठी नेहमीच दर्शकांना वैविधपूर्ण कार्यक्रमांचा नजराणा देत असते. झी मराठीच्या मालिकाच नाही तर कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे कानाला खडा. चॅट शो प्रकारात मोडत असलेल्या या कार्यक्रमात आजपर्यंत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.

या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन संजय मोने करतात. संजयच्या मिश्किल आणि गप्पिष्ट स्वभावामुळे अनेक सेलिब्रिटी अगदी सहज त्यांच्याशी आयुष्यातील कानाला खडा लावणारे प्रसंग शेअर करत असतात.

या कार्यक्रमाच्या या वेळच्या एपिसोडमध्ये पाहुणी असणार आहे राखी सावंत. अभिनेत्री, आयटम गर्ल, कॉन्ट्रावर्सी क्वीन अशी अनेक बिरुदं मिरवणारी राखी तिच्या आयुष्यातील कोणकोणते कानाला खडा लावणारे प्रसंग शेअर करते ते पुढच्या एपिसोडमध्ये कळेलच. याशिवाय राखी तिच्या लग्नाविषयी काही रहस्य उघड करते का हे ऐकण्याची उत्सुकताही रसिकांमध्ये आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1088436760118464518

Recommended

Share