By  
on  

Video : श्रेया बुगडेचा पारा चढला आणि कुशलच्या स्पाय कॅमने तो टिपला

काय मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे....असा आपुलकीचा प्रश्न विचारत अवघ्या महाराष्ट्राला टेन्शन विसरायला लावून खळखळून हसवायला लावणारा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या लॉकडाऊनच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके या विनोदवीरांची दोस्ती जगजाहीर आहे. पडद्याप्रमाणे ख-या आयुष्यातसुध्दा या दोस्तांची धम्माल केमिस्ट्री रंगते. चला हवा येऊ द्या शोच्या शूटींपूर्वी मेकअपरुमध्ये तयार होताना कुशलने हळूच श्रेयाचं शूट केलं आणि त्यावेळेस तिचा जो पारा चढला होता तो अचूक त्याने टिपला. ही मस्ती त्याने नुकतीच सोशल मिडीयावरुन  शेअर केली आहे.

तुम्हालासुध्दा हा व्हिडीओ पाहून खुप हसू येईल. 

 

सर्वांचे आवडते विनोदवीर पुन्हा त्याच ढंगात नव्या विनोदांची मेजवानी घेऊन येत असल्याने प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आलं आहे. अशातच या विनोदवीरांची जशी पडद्यासमोर धम्माल मस्ती सुरु असते तशीच पडद्यामागेसुध्दा असते.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive