By  
on  

"बरं झालं चॅलेंज दिलं" म्हणतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी

सध्या सोशल मिडीयावर महिलांनी त्यांचे ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो पोस्ट केलेले जर तुम्ही पाहिले असेल तर हे आहे नवं चॅलेंज. महिला सशक्तिकरणाचं हे चॅलेंज आहे. या चॅलेंजमध्ये महिला एकमेकांना हे चॅलेंज करून ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. याचाच महिला एकमेकांचं समर्थन करण्याचाही अर्थ आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार हा चॅलेंज मोठ्या प्रमाणात करत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील आता या चॅलेंजमध्ये सहभागी झाली आहे. तिला या चॅलेंजसाठी कोण नामांकीत करेल याची ती वाट पाहत होती. आणि अखेर हे चॅलेंज स्विकारत तिने तिचा सुंदर ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. 

या पोस्टमध्ये प्राजक्ता लिहीते की, "बरं झालं चॅलेंज दिलं, श्रद्धा आणि रिमा. खूप दिवसांपासून हा ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो पोस्ट करायचा होता. बहुतांश सगळ्यांनी फोटो पोस्ट करुन झालेत. आता कोणाला कामाला लावत नाही. बाकी जागतल्या सगळ्या स्त्रियांना कडकडून मिठी. आपण भारीच आहोत , चॅलेंज ही फक्त आठवण करून देणारी गोष्ट आहे."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बरं झालं challenge दिलं.. @shraddha_kakade @yogawithreema खूप दिवसांपासून हा #blackandwhite photo post करायचाच होता . बहुतांश सगळ्यांनी photo post करून झालेत; so आता कोणाला कामाला लावत नाही . बाकी जगातल्या सगळ्या स्त्रियांना कडकडून मिठी ️ आपण भारीच आहोत, #challenge तो सिर्फ़ reminder हैं। . #feminist #female #वसंतसेना #majorethrowback #5yearsold pic #prajaktamali @‍️

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

 

 सध्या बॉलिवुडसह मराठी कलाविश्वातील कलाकारही हे चॅलेंज स्विकारून त्यांचे ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत. इन्स्टाग्रामवर हे चॅलेंज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive