By  
on  

सई ताम्हणकरला पुन्हा जायचं या ठिकाणी, पण करोनाने लावलीय पुरती वाट

लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वचजण घरात बसून कंटाळलो आहोत. त्यात कितीही छंदात वेळ रमवला, घरकाम केलं, कुटुंबियांसोबत राहिलो तरी बाहेरचं जग नेहमीच खुणावतं. यंदा सर्वांच्याच म्हणजेच लहानांपासून ते मोठ्यापर्यंतच्या सुट्ट्या या करोनामुळे अक्षरश: घरात बसून गेल्या. सेलिब्रिटीसुध्दा याला अपवाद नाहीत. 

आपल्या सई बाईंचंसुध्दा असंच झालं आहे. त्यांनीसुध्दा करोनाच्या नावाने खडे फोडले आहेत. सई ताम्हणकरलाअरुणाचल प्रदेशच्या झिरो ठिकाणी पुन्हा हॉलिडेला जायची इच्छा आहे. ती आठवण तिने नुकतीच सोशल मिडीयावरुन शेअर केली आहे. मला पुन्हा तिथे घेऊन चला असं सईचं म्हणणं आहे आणि या करोनामुळे फिरायला जाता येत नसल्याने तिने नाराजीचा सूर उमटवलाय.

 

सईने या सुंदर फोटोचं क्रेडीट अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिला दिलं आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive