By  
on  

मराठी सिनेमाचा अटकेपार झेंडा, रवी जाधव म्हणतात 'आनंद आणि अभिमान' !

‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ हा सर्वात जुना आणि लोकप्रिय असलेला चित्रपट महोत्सव.  १९३२ पासून सुरु असलेल्या या महोत्सवात यंदा तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी हा आनंद सर्वांसोबत इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शेअर केला . 

'कोर्ट' फेम  दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड करण्यात आली. त्यामुळे रवी जाधव यांनी दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन करत संपूर्ण मराठी सिनेविश्वासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. 

रवी जाधव म्हणतात, "“तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट ही आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’! त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टीम”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आनंद आणि अभिमान

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

 

 चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी सिनेमाला ६२ वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive