By  
on  

'दोघांनाही गेली पाच वर्ष तुम्ही जे भरभरुन प्रेम दिले त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद'

मराठीतला डॅशिंग आणि हॅण्डसम हंक अभिनेता अशी गश्मी महाजनीची ओळख आहे, मराठी सिनेमे , नाटकं आणि इतकंच नव्हे त हिंदीतही तो आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसतो. लवकरच तो सोनी लिव्हवर  वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला  येणार आहे. अद्याप फक्त याचा टीझर रिलीज झाला आहे. तो पाहता एक्शन-थ्रीलर असलेली ही हिंदी वेबसिरीज आहे. एसओटी- सर्जिकल ऑपरेशन टीम  असं तिचं नाव असून चाहत्यांमध्ये याची उत्सुकता आहे. गश्मिरला या नव्या प्लॅटफॉर्मवर डॅशिंग अंदाजात पाहायला कोणाला नाही आवडणार.

पण त्यापूर्वी त्याच्या या दोन मराठी सिनेमांमुळे त्याच्या कारकिर्दीला नवं वळण मिळालं ते म्हणजे, देऊळ बंद आणि कॅरी ऑन मराठामुळे. या भूमिकासांठी गश्मीर कृतज्ञता व्यक्त करतो. त्याने या सिनेमांच्या आठवणींना नुकताच उजाळा दिला आहे.  

गश्मिर महाजनी प्रेक्षकांचे आभार मानत म्हणतो, " राघव शास्त्री आणि मार्तंड ला आज पाच वर्ष पूर्ण झाली.एकात दुधाची डेअरी चालवणारा, आखाड्यात कुस्ती खेळणारा मार्तंड, तर दुसरीकडे थेट भारतात परतलेला NASA चा सायंटिस्ट “राघव शास्त्री”.दोघांनाही गेली पाच वर्ष तुम्ही जे भरभरुन प्रेम दिले आहे त्या साठी कोटी कोटी धन्यवाद. "

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

5 years of DEOOL BAND & CARRY ON MARATHA... राघव शास्त्री आणि मार्तंड ला आज पाच वर्ष पूर्ण झाली. एकात दुधाची डेअरी चालवणारा, आखाड्यात कुस्ती खेळणारा मार्तंड, तर दुसरीकडे थेट भारतात परतलेला NASA चा सायंटिस्ट “राघव शास्त्री”. दोघांनाही गेली पाच वर्ष तुम्ही जे भरभरुन प्रेम दिले आहे त्या साठी कोटी कोटी धन्यवाद

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive