By  
on  

सोशल मिडियावर झाला अभिनेत्री जुई गडकरीच्या फोटोंचा गैरवापर, वाचा सविस्तर

सोशल मिडियाचा वापर करत नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. आजकाल सोशल मिडियाचं प्रस्थ जितकं वाढतं आहे. तितकंच त्याचे दुरुपयोग वाढताना दिसत आहेत. अभिनेत्री जुई गडकरीलाही असाच काहीसा अनुभव आला आहे. 
जुईच्या सोशल मिडियावरील फोटोचा गैरवापर झाल्याचं समोर आलं आहे. जुईने याविरोधात ठाणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे.  

 

फेसबूकवर असलेल्या 'पुनर्विवाह' हा पेजवर जुईचा फोटो आक्षेपार्ह मेसेजसह पोस्ट केला होता. जुईच्या एका फॅनने ही बाब लक्षात आणून दिल्यावर तिने या पेजबाबत माहिती घेऊन ठाणे सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही बाब जुईने तिच्या फेसबूक अकाउंटवरून शेअर केली आहे. यासोबतच तिने सोशल मिडिया वापरताना काळजी घेण्याचं आवाहनही चाहत्यांना केलं आहे.

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive