By  
on  

'जगणं महागलय हे ठाऊक आहे... पण, आत्महत्या करणं इतकं स्वस्त झालय??'

करोना संकट आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे यंदा अनेक अघटित घटनांना आपण सारेच सामोरो जातोय. त्यात कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या आत्महत्येची सत्रं थांबतच नाहीत. दिवसागणिक अनेक कलाकार आत्महत्या करत असल्याचं उघडकीस येतेय. आजूबाजूला नैराश्येमय वातावरण असल्यामुळे हे कलाकार मागचा-पुढचा विचार न करता जीवन संपविण्याचं टोकाचं पाऊल उचलतायत. 

कालच्या दिवसभरात दोन कलाकारांच्या आत्महत्येच्या घटनांनी कलाविश्व हादरलं. टीव्ही अभिनेता समीर शर्मा आणि भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. 

या आत्महत्येच्या घटना ऐकून संपूर्ण कलाविश्वात कमालीची अस्वस्थता पसरलीय. अनेकजण सोशल मिडीयावरुन या गंभीर घटनांवर व्यक्त होत आहेत. मराठी सिनेमांचे प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे नेहमीच विविध विषयांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होताना पाहायला मिळतात. या घटना ऐकून तेसुध्दा खुप अस्वस्थ आहेत.   ते म्हणतात, जगणं महागलय हे ठाऊक आहे... पण, आत्महत्या करणं इतकं स्वस्त झालय?? 

 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण तर सध्या देशभर गाजतंय. मागच्याच आठवड्यात मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली. या आणि अशा अनेक आत्महत्येच्या हदयद्रावक घटना ऐकायला मिळतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive