“२०२० मॅच आपल्या आयुष्यासोबत सुरू आहे की काय”?: केदार शिंदें

By  
on  

करोना संकट आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे यंदा अनेक अघटित घटनांना आपण सारेच सामोरो जातोय. त्यात कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या आत्महत्येची सत्रं थांबतच नाहीत. त्यात आता आणखी संकटं कोसळतायत. नुकंतच दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला केरळमध्ये अपघात झाला आहे. केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने हा भीषण अपघात घडला. या अशा घटनांमुळे २०२० हे साल किती दुर्देवी ठरतंय याचा अंदाज आपण सारेच बांधतोय. 

मराठी सिनेमांचे प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे नेहमीच विविध विषयांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होताना पाहायला मिळतात. या घटना ऐकून तेसुध्दा खुप अस्वस्थ आहेत.  

“२०२० मॅच आपल्या आयुष्यासोबत सुरू आहे की काय? असं वाटू लागलय. कधी संपतंय हे वर्ष असं झालंय!!! #AirIndiaCrash #2020worstyear #2020mood”, असं ते म्हणाले आहेत.

 

Recommended

Loading...
Share