By  
on  

हा मराठी अभिनेता म्हणतो 'मोर पिसारा, तसा शहारा सारा माझ्या अवती भवती'

सर्वत्र पावसाचं बेधुंद वातावरण आहे. प्रत्येकजण आपापल्या घरातूनच यंदा पावसाचा आनंद घेतोय. जुन्या पावसाळी पिकनीकच्या आठवणींना उजाळा देतोय. पण पाऊस आणि कवीता याचं फार जुनं नातं आहे. पाऊस म्हटलं की  त्यासोबतीने कवीता या आल्याचं. पावसाळी वातावरणच तसं असतं. सर्वत्र हिरवंगार वातावरण त्यात धुक्याची दुलई आणि रिमझीम बरसणारा पाऊसं. मग काय, प्रत्येकातला कवी आपसूकच जागा होतो. 

आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारा विनोदवीर कुशल बद्रिकेनेसुध्दा एका खास कविता शेअर केलीय. तो म्हणतो. 

आभाळाचा पदर जरासा
ढळला पडला धरती वरती,
मोर पिसारा, तसा शहारा
सारा माझ्या अवती भवती.

या अप्रतिम कवितेसह कुशलने दुधासारख्या फेसाळत्या आणि दुथडी भरुन वाहणा-या पाण्यात काढलेला त्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे आपसूकच कवितेचा अर्थ समजतोय. 

कुशलची ही सुंदर कविता वाचून चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive