आईने दिल्या कुटुंबातल्या या लाडक्या सदस्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

By  
on  

आई कुठे काय करते ही मालिका दिवसागणिक त्यातील ट्विस्टमुळे प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. लॉकडाऊननंतरच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही ही मालिका पाहण्याचा प्रेक्षकांचा उत्साह अजूनसुध्दा तितकाच आहे. अरुंधतीने प्रेमाने जोडलेलं हे देशमुख कुटुंब आणि त्यातील नाती आपल्याला आपल्याच घरातील वाटतात. 

याच देशमुख कुटुंबातल्या अरुंधतीच्या मोठ्या लेकाचा म्हणजेच अभिषेकचा वाढदिवस. म्हणूनच अभिषेकसाठी त्याची आई म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखलेने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. 

मधुराणी  अभिनेता निरंजन कुलकर्णीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणते, निरु , तुला माहितेय....तू आम्हा सगळ्यांचा किती लाडका आहेस......!!! असाच राहा...!!!!

 

तर निरंजनने त्याच्या मागच्या एका पोस्टमध्ये आई म्हणजेच मधुराणी गोखलेसोबतचा फोटो पोस्ट करत, आई तुझ्या चेहेर्यावरच हे हसू मी कधीच कमी होऊ देणार नाही .असं म्हटलं होतं. 

 

 

यावरुनच या संपूर्ण कुटुंबातलं ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन बॉन्डीग दिसून येतं.  

Recommended

Loading...
Share