पाहा व्हिडीओ : अखेर चार महिन्यांनी अमृता सुभाष आणि तिच्या आईची झाली गाठभेट

By  
on  

करोना संकटामुळे जवळपास तीन महिने सर्वच ठप्प होतं, पण  काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत पुनश्च हरिओम म्हणत प्रत्येकाने हळूहळू कामाला सुरुवात केलीय. संकट टळलं नसलं तरी त्यातून योग्य तो मार्ग काढत आपल्याला पुढे जायचंय. हाच प्रेरणादायी संदेश आपल्या गाण्यातून देतायत प्रतिभावान अभिनेत्री असलेल्या या मायलेकी. म्हणजेच अभिनेत्री ज्योती सुभाष आणि अभिनेत्री अमृता सुभाष. 

आईसोबत किशोरदा आणि लतादीदींचं हे अप्रतिम गाणं एकत्र गात अमृता म्हणते, "अखेर चार महीन्यांनी मी आईला भेटले. आधी क्वारंटाईन झाले आणि मग आईला बिलगले. हा दिवस सुंदर होता. चार आॅगस्ट, किशोरदांचा वाढदिवस! म्हणून किशोरदींचं हे गाणं गायलो आम्ही. या गाण्यातून मिळणार्या आशेच्या किरणांची आत्ता आपल्या सगळ्यांना गरज आहे."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Finally I met my mother after four months. First quarantined myself and finally hugged her on 4 th August.Kishor da’s Birthday! We love this song by Kishor da! We need the hope this song is giving! Love and blessings to all of you! shooting by @sandesh.kulkarni.actor #mother #love #blessings अखेर चार महीन्यांनी मी आईला भेटले. आधी क्वारंटाईन झाले आणि मग आईला बिलगले. हा दिवस सुंदर होता. चार आॅगस्ट, किशोरदांचा वाढदिवस! म्हणून किशोरदींचं हे गाणं गायलो आम्ही. या गाण्यातून मिळणार्या आशेच्या किरणांची आत्ता आपल्या सगळ्यांना गरज आहे. ️

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash) on

Recommended

Loading...
Share