By  
on  

गोपाळकालानिमित्त तुझ्यात जीव रंगलाच्या या गोड आठवणींना मिळाला उजाळा

सध्या देशावर करोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदा प्रत्येक सण आणि उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यावर आपण  भर देतोय. त्यातच कृष्ण जन्माष्टमी  आणि आज दहीहंडी असल्यामुळे सर्वत्र आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण पसरलं आहे. प्रत्येक जण घरी राहून हा सण साजरा करतोय. पण गोपाळकाल्याची ती धम्माल, छोट्या दोस्तांची लुडबूड सारं काही आपण यावर्षी मिस करत असलो तरी आठवणींमधून आपण त्यांना उजाळा तर नक्कीच देऊ शकतो. 

वहिनी साहेबांचा दरारा तुम्हाला माहितच आहे. पडद्यावर जरी त्या लाडूचा तिरस्कार करत असल्या तरी ऑफस्क्रीन मात्र त्या लाडूवर प्रचंड माया करायच्या. वहिनीसाहेब फेम अभिेनत्री धनश्री काडगावकरने  तुझ्यात जीव रंगलाच्या सेटवरचा हा फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

धनश्रीची जरी मालिकेतून एक्झीट झाली असली तरी ती आठवणींच्या माध्यमातून संपूर्ण टीमच्या संपर्कात असते. आज गोपाळकालानिमित्त लाडू साकारणारा बालकलाकार राजवीरसोबतचा हा गोड  फोटो चाहत्यांसोबबत शेअर केला आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive