ऑनस्क्रीन श्रीकृष्णाने म्हणजेच स्वप्नील जोशीने सोनाली कुलकर्णीला दिली आहे ही खास भेट

By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच दुबईहून भारतात परतली आहे. सोनाली लॉकडाऊन पुर्वी दुबईमध्ये फियॉन्से कुणालसोबत होती. पण भारतात येण्यापुर्वीच आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद झाल्याने तिला दुबईमध्येच रहावं लागलं. पण आता ती भारतात आली आहे. 

 

 

याचदरम्यान सोनालीने एक व्हिडियोही शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये तिने होम क्वारंटाईनच्या काळात भगवद्तगीता वाचणार असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे ही गीता तिला ऑनस्क्रीन श्रीकृष्णाने म्हणजेच स्वप्नील जोशीने भेट दिली आहे. गोपाळकाल्याच्या दिवसाचं औचित्य साधत तिने भगवद्तगीता वाचण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच लॉकडाऊनमुळे आपली भेट होणार नसली तरी लवकरच भेटण्याची आशाही तिने व्यक्त केली आहे. भारतात आली आहे हे समजल्यावर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Recommended

Loading...
Share